उरळ पोलीस स्टेशनची धडक कारवाई
बाळापूर : उरळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकून देशी दारूचा एकूण 2120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय जयदेव वाघ (वय 48, रा. वझेगाव ता. बाळापूर) याला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवर कारवाई
दिनांक 27 रोजी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम वझेगाव येथे विजय जयदेव वाघ आपल्या राहत्या घरी देशी दारूची अवैध विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला असता आरोपी प्रत्यक्ष देशी दारू विक्री करताना दिसून आला.
मुद्देमाल जप्त
तपासणी दरम्यान आरोपीकडून –
देशी दारू टॅंगो पंच नं. 1 चे 90 मि.ली. क्षमतेचे 9 नग, किंमत रुपये 360
देशी दारू संत्रा चे 180 मि.ली. क्षमतेचे 22 नग, किंमत रुपये 1760
असा एकूण 2120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात एपीआय पंकज कांबळे, हेड कॉन्स्टेबल संतोष भोजने, पोलीस कॉन्स्टेबल नागेश बाभुळकर, महिला अंमलदार मनाली आडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल शुभम बोडखे व होमगार्ड यांचा सहभाग होता.
read also : https://ajinkyabharat.com/ashiya-cup-2025-india-pakistan-is-the-best-face-today/