2027 ODI World Cupलंडन : क्रिकेट विश्वात 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी मोठी चर्चा सुरु झाली आहे. इंग्लंडचा दिग्गज माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी या स्पर्धेचा विजेता कोण होईल याबाबत धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. वॉनच्या मते, 2027 चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकणार आहे.दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत वर्ल्ड कप विजेतेपद मिळवता आलेले नाही, मात्र सध्या संघाची कामगिरी उत्कृष्ट आहे. मायकल वॉनने विशेषतः नमूद केले की, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केले आणि इंग्लंडमध्ये 27 वर्षानंतर मालिका जिंकली आहे, त्यामुळे त्यांचा संघ आत्मविश्वासपूर्ण स्थितीत आहे.
दक्षिण आफ्रिकेची सध्या कामगिरी
टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी
पहिल्या मॅचमध्ये इंग्लंड 131 धावांवर बाद; दक्षिण आफ्रिकेने 7 विकेटने मॅच जिंकली
दुसऱ्या मॅचमध्ये 330 धावा; इंग्लंडला 5 धावांनी हरवले
लॉर्डस मैदानावर विदेशी संघानं केलेली सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली
याशिवाय, क्रिकेट जगतातील नवीन टॅलेंट मॅथ्यू ब्रीत्ज देखील चर्चेत आहे. तो पहिला क्रिकेटपटू ठरला, ज्याने करिअरच्या पहिल्या पाच वनडेमध्ये किमान 50 धावा केल्या.
2027 वर्ल्ड कप – माहिती
स्पर्धेचे आयोजन: दक्षिण आफ्रिका, झिम्बॉम्ब्वे आणि नामिबिया
सहभागी संघ: 14 संघ
एकूण सामने: 54
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉम्ब्वे आयोजक असल्याने स्पर्धेत थेट पात्र, नामिबियाला पात्रता फेरीतील सामने जिंकावे लागतील
दरम्यान, 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला अहमदाबादमध्ये पराभूत केले होते. भारताच्या संघाच्या नेतृत्वाबाबतही चर्चा सुरु आहे, रोहित शर्मा पुढील वनडे संघाचे नेतृत्व करणार की बदल होणार यावर लक्ष ठेवले जात आहे.