मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Related News
मुंबईत मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २१ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच, पोलिस मार्ग व्यवस्थापन आणि वाहतूक अपडेटसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतील. शहरात १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे वापरले जातील आणि ड्रोनचा वापर केला जाईल. मुंबई पोलिसांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.
मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या संदेशात दावा करण्यात आला आहे की १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. स्फोट घडवण्यासाठी ४०० किलो आरडीएक्सचा वापर केला जाईल. धमकीच्या संदेशानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस हाय अलर्टवर आहेत. गुन्हे शाखेने धमकीची चौकशी सुरू केली आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इतर एजन्सींनाही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईकरांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शनिवारी सुमारे सात हजार सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल, म्हणजेच १० दिवसांचा गणेशोत्सव संपणार आहे. या अनुषंगाने दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर तसेच ड्रोन च्या मदतीने सर्वत्र नजर ठेवली जाणार आहे.