मुंबई – मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला.
या प्रकरणातील सर्व सातही आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले आहे.
यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित,
मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात ३२३ साक्षीदार तपासले गेले,
मात्र ३७ साक्षीदारांनी आपले जबाब फिरवले. तपास यंत्रणांनी गंभीर आरोप करत
मृत्युदंडाची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं.
या निकालामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधले असून,
अनेक राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/martyr-jawan-yanchayavar-government-itamat-antyaskar/