2 हजार किलो रांगोळी, बाबासाहेबांचे विचार आणि अकोल्याची अभिमानास्पद कलाकृती

2 हजार किलो रांगोळी, बाबासाहेबांचे विचार आणि अकोल्याची अभिमानास्पद कलाकृती

अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अकोल्यात

एक प्रेरणादायी आणि अभूतपूर्व उपक्रम राबवण्यात आला आहे.

अकोला शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल १८००० चौरस फूट क्षेत्रफळावर

Related News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे, ४० स्थानिक रांगोळी कलाकारांनी सलग ४० तास दिवसरात्र मेहनत घेत ही रचना साकारली असून,

त्यासाठी २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. या रांगोळीच्या माध्यमातून

बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवले असून, त्यांना कलात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

या अद्वितीय उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

कलाध्यापक संघ आणि काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती सेलच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

रांगोळी पाहण्यासाठी अकोल्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Related News