20 फुटांचा धक्कादायक खड्डा, परिसरात भीतीचे वातावरण” बातमी:

20 फुटांचा

मुंबई – शिवडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रस्त्याचा एक मोठा भाग थेट खाली नाल्यात कोसळला असून, तब्बल 20 फुटांचा खड्डा पडल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे.सुदैवाने रस्ता खचल्याच्या वेळी तिथून कुठलीही गाडी जात नव्हती, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सध्या पोलिसांनी खड्ड्याच्या आसपास बॅरिकेटिंग करून परिसरात सुरक्षितता सुनिश्चित केली आहे.स्थानिकांनी प्रशासनाला या घटनेची माहिती दिली असून, शिवडी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण सध्या पाऊसही पडत नसतानाही रस्ता खचल्याची घटना घडली आहे.स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, आणि नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्यास सांगितले गेले आहे.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/35-gawanmadhyay-panand-rastyanchi-gupta-pahani-suru/