17 हजार पदांसाठी संधी

एसटी महामंडळात बम्पर भरती

मुंबई : एसटी महामंडळात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर! सरकारने तब्बल 17,450 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याची घोषणा केली आहे. यशस्वी उमेदवारांना सुरुवातीपासूनच 30 हजार रुपये पगार मिळणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरकारतर्फे कंत्राटी चालक आणि सहाय्यक पदांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. या भरतीसाठी निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार असून, यशस्वी उमेदवारांना 30 हजार रुपये पेक्षा जास्त पगार मिळणार आहे.

भरतीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत, तसेच पात्रता व इतर आवश्यक अटींची माहिती जाहीर होताच तपासणी करावी. भरतीची अधिक माहिती लवकरच सरकारकडून प्रसिद्ध होईल.

यामुळे, एसटी महामंडळात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तरुणांसाठी आहे.

read also :https://ajinkyabharat.com/telharathail-shahanna-pargharamol-kutumbachi-bhet/