’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी

’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी

सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे.

वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार

Related News

परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी-ज्यांनी वाल्मिक कराडला

फरार होण्यास मदत केली होती, त्यासंबंधीचे पुरावे, कागदपत्रं

आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करावं अशी मागणी धस यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

यामुळे खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहेत.

त्याचं कन्फर्मेशन साहेबांनी दिलंय. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह

जवळपास २८०० कोटी रुपयांचा प्रकल्प माझ्या मतदारसंघात येत आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत आहेत.

बाकीच्या काही गोष्टीबाबत मी साहेबांशी चर्चा केली आहे. त्या संदर्भात पत्रही दिलं आहे.

त्यातील पहिलं पत्र आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा

पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या बीड

जिल्ह्याबाहेर बदल्या कराव्यात, दुसरं वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली,

ते सर्व लोक, त्यांचे नंबर्स पोलिसांना दिले आहेत. त्या सर्वांना सह आरोपी करा, नंतर परळी नगर पालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं.

काल ऑडिट म्हटलं होतं. पण स्पेशल ऑडिट झालं पाहिजे. कारण एका एका व्यक्तीच्या

नावावर ४६-४६ कोटी रुपयांची बिले उचलली गेली आहेत.  विष्णू चाटे सारख्या आरोपीच्या नावावर ४६ कोटी रुपये  उचलले.

एकाच रस्त्यासाठी पाचवेळा पैसे घेतले, असा गंभीर आरोप सुरेश धस यानी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भास्कर केंद्रे नावाच्या पोली अधिकाऱ्यावर

देखील गंभीर आरोप केले आहेत. 15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथेच आहेत.

त्याचे स्वत:चे १५ जेसीबी आहेत. १०० राखेचे टिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची

आर्धी पार्टनरशीप आहे. मीडियाने परळीत जाऊन चेक करावं, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/mahakumbhasathi-janya-special-trainyar-halla-khidkya-darchare-damage/

Related News