केवळ 3 हजार रुपयात मिळणार वार्षिक पास..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वाची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की भारत सरकार आगामी 15 ऑगस्ट 2025 पासून वार्षिक
FASTag-आधारित टोल पास ₹ 3,000 किंमतीच्या अंमलबजावणीवर विचार करत आहे.
या वार्षिक पास मध्ये 200 वेळा टोल पार करू शकतात.
ही वार्षिक टोल पास सुरू झाली तर याचा फायदा अनेक वाहनधारकांना होणार राज्य महामार्ग असो की राष्ट्रीय
महामार्ग असो यावर अनेक वेळा वाहनधारकांना फास्टटॅगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कधी कधी
या फास्टट्रॅक अकाउंट मधून ज्यादा पैसे सुद्धा भरावे लागतात परंतु केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केलेली
ही घोषणा पाहता याचा नक्कीच दिलासा वाहनधारकांना मिळाला आहे. गडकरींनी पुढे जोर दिला
की एकूण टोल महसूलात खाजगी वाहने केवळ 26% योगदान देतात, उर्वरित 74% व्यावसायिक वाहनांमधून येतात.
खाजगी वाहनधारक या वार्षिक पासचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतात अशी अपेक्षा भारत सरकार द्वारा व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/hivarkhed-madhe-kavad-yatra-enthusiast/