15 दिवसात निधी खर्च न केल्यास आंदोलनाचा इशारा

आंदोलनाचा इशारा

पातुर –  शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना विविध सेवा व सुविधा पुरविण्याबाबत प्रहार सेवक संतोष इंगळे

यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी ग्रामसचिवांना निवेदन सादर केले. १८ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या या निवेदनामध्ये काही

महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश होता.

निवेदनामध्ये बऱ्याच वर्षांपासून दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला ५% निधी अद्याप वितरित न केल्याबाबत तक्रार केली गेली असून,

हा निधी १५ दिवसांच्या आत वितरित करण्याची मागणी केली आहे.

तसेच, १९९५-९६ च्या अधिनियमाच्या कलम १३ नुसार रीतसर स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीच्या शिफारसीनुसार

दिव्यांग व्यक्तींना २०० चौ. फूट जागा पुरवावी, तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा  करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी

मोकळी जागा उद्योगासाठी उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात सांगण्यात आले.

याशिवाय, दिव्यांग कायदा (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५) च्या कलम ३२ व ३३ अन्वये,

दिव्यांग व्यक्तींना शासकीय व निमशासकीय प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात ग्रामपंचायत शिरला येथे दिव्यांग व्यक्तीसाठी कर्मचारी नियुक्त करून रोजगार उपलब्ध

करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. जर ग्रामपंचायताने १५ दिवसांच्या आत हा निधी खर्च केला नाही, तर निवेदनकर्त्यांनी

थालीबजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात संतोष इंगळे यांच्यासह गावातील अनेक अपंग बांधव सहभागी झाले होते.

Read also :  https://ajinkyabharat.com/shetkyancha-aakrosh-murtijapur-yehet-kala-poa-movement/