नवी दिल्ली :
केवळ १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने शनिवारी IPL मध्ये पदार्पण करताच आपल्या खेळीने साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सर्वांना चकित केलं.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
मात्र ही प्रतिभा एका रात्रीत घडलेली नाही. या यशामागे त्याच्या वडिलांचे, प्रशिक्षकांचे
आणि अनेकांच्या अथक परिश्रमांचे योगदान आहे.
वैभवच्या क्रिकेट स्वप्नांना उंच भरारी द्यावी म्हणून त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी
आपल्या शेतीची जमीन विकून त्याला संधी दिली.
पटण्याचे क्रिकेट प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या विशेष गुणी मुलामध्ये असलेली क्षमता ओळखली.
त्यांनी १० वर्षांच्या वैभवला दररोज किमान ६०० चेंडूंचा सामना करायला लावून त्याला मोठ्या स्पर्धांसाठी तयार केलं.
राजस्थान रॉयल्सच्या राहुल द्रविड आणि जुबिन भरूचा यांनीही त्याला झगमगता तारा बनवण्यासाठी मेहनत घेतली.
त्यांनी आयपीएलपूर्वी त्याला १५० किमी प्रतितास वेगाने साइड-आर्म थ्रोडाउनचा सामना करवून दिला.
हे सगळं वैभवसाठी मोठं आव्हान होतं, पण त्याने ते यशस्वीरित्या पार केलं.
आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १.१० कोटी रुपयांना विकत घेतलं.
त्याचे प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही त्याचा शॉट पाहिला, बॅटची स्विंग आणि टायमिंग पाहिलं.
फक्त ताकदीवर षटकार लागत नसतात, नाहीतर सगळे पैलवान क्रिकेटर झाले असते.
ही त्या मुलाच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाची फळं आहे – रोज ६०० चेंडूंचा सामना, हे सोपं नाही.”
आज वैभव सूर्यवंशी केवळ एक खेळाडू नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे,
ज्याच्या यशामागे त्याचा संघर्ष, त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षकांचे कर्तृत्व आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyaye/