‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’

'१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे'

गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या

मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी

आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. हे दोघेही १२वी नापास असूनही,

Related News

भारतातील महत्त्वाच्या शासकीय आणि खासगी वेबसाईट्स हॅक करत होते.

ही अटक भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’

दरम्यान करण्यात आली आहे. या ऑपरेशनचा उद्देश म्हणजे पाकिस्तानी

गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवणाऱ्या देशातील गद्दारांना शोधून काढणे.

काय होते आरोप?

  • जसीम आणि त्याचा साथीदार भारतीय वेबसाइट्स हॅक करून निष्क्रिय (DISABLE) करत होते.

  • त्यांनी भारतविरोधी संदेश ऑनलाइन पोस्ट केले.

  • हॅकिंगची माहिती आणि पुरावे हे दोघं त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर शेअर करत होते.

  • त्यांनी असेही लिहिले होते की, “भारताने हे सुरू केलंय, आता आम्ही ते संपवू.”

कुटुंबाची प्रतिक्रिया

जसीमच्या अटकेनंतर त्याचे कुटुंबीय संतप्त झाले. त्याच्या आईने कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला.

गुजरात ATS च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रेस टीमशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

कुटुंबीयांनी कॅमेरा फोडण्याचाही प्रयत्न केला.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट

या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला असून, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित तरुण हॅकिंगसारख्या

गुन्ह्यांमध्ये सामील होत असल्याची धोक्याची घंटा मानली जात आहे. या दोघांकडून पाकिस्तानी लिंकची चौकशी करण्यात येत असून,

त्यांच्या डिव्हाइस आणि ऑनलाइन चॅनल्सची बारकाईने तपासणी सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/new-bus-sthan-t/

Related News