पुण्याची लढत प्रतिष्ठेची, धंगेकरांसाठी १२ आमदारांची फौज तळ ठोकून

रवींद्र धंगेकर

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील बारा आमदारांसह परराज्यातील लोकप्रतिनिधींनी पुण्यात ठाण मांडले आहे.

यामध्ये विदर्भातील सहा आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसने पुण्याची जागा प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी कर्नाटकातूनही पुण्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे.

Related News

‘देशात सध्या मोदी सरकार व भाजपविरोधात जनमत तयार झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेण्याची हीच योग्य संधी आहे.

थोडी अधिक मेहनत घेतल्यास पुण्यात विजय नक्की मिळू शकतो,’ असे काँग्रेसच्या अहवालातून समोर आले आहे. राहुल गांधींच्या सभेमुळे पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

निरीक्षकांशिवाय सांगलीची निवडणूक झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम हेदेखील पुणे लोकसभा समन्वयक म्हणून प्रचारात सक्रिय झाले आहेत.

विदर्भातील मतदान झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील सहा आमदारांची पुण्यात निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून, प्रत्येकाला एक विधानसभा मतदारसंघ वाटून दिला आहे.

या निरीक्षकांनी दररोज या मतदारसंघात फिरून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोट बांधून प्रचारावर भर द्यायचा आहे.

Related News