११ व्या हातमाग दिनानिमित्त विणकर महिलांना विवर आयडी कार्डचे वाटप

११ व्या हातमाग दिनानिमित्त विणकर महिलांना विवर आयडी कार्डचे वाटप

आमदार सई ताई डहाके यांच्या हस्ते विवर आयडी कार्ड चे वाटप

कारंजा –दि.७

११ व्या हातमाग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विणकर महिलांना आमदार डहाके यांच्या हस्ते

विवर आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय,

विकास आयुक्त कार्यालय विणकर सेवा केंद्र आणि समयमती महिला ग्रामोद्योग केंद्र,

कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन पंडित देवकीनंदन सभागृह, म.ब्र. आश्रम येथे करण्यात आले होते.

यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. विणकर क्षेत्रातील महिलांना ओळख मिळावी,

त्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या योजना थेट पोहोचाव्यात या उद्देशाने विवर आयडी कार्ड वाटप करण्यात आले.

यामुळे महिलांना विविध शासकीय लाभ, प्रशिक्षण सुविधा तसेच योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार

असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

समयमती महिला ग्रामोद्योग केंद्राच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read Also : https://ajinkyabharat.com/umbarda-bazar-yehet-pavasachi-hajeri/