झारखंड: शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू

झारखंड

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून

नोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी 22 ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या घटनेची माहिती देताना ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान 11 उमेदवारांचा मृत्यू झाला.

Related News

पलामूमध्ये 4, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी दोन आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी 1 तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अमोल व्ही होमकर म्हणाले की, शारीरिक निवड प्रक्रियेत आतापर्यंत 1,27,732 उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यात 78,023उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या 56,441 तर महिला उमेदवारांची संख्या 21,582 होती.

उमेदवारांच्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/

Related News