10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी : राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS अधिकाऱ्यांचे सध्याचे ठिकाणी आणि बदली झालेला पदभार

1 . अंजली रमेश (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, SSC आणि HSC बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

3. प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

4. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

5.  राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/the-biggest-decision-taken-by-india-or-the-nation-is-taken-by-thousands-of-indians/