“१० दिवस पाणी नाही! संतप्त नागरिकांसह शिवसेनेचा प्रशासनाला इशारा”

“अकोटकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेचे मडकेफोड आंदोलन”

अकोट :अकोट शहरातील पाणीटंचाई व अतिक्रमणग्रस्त नागरिकांच्या घरकुलाच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगर परिषद व जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची मडकी फोडून निषेध व्यक्त केला. राजेंद्र नगर भागात दहा-दहा दिवस नळ येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव असूनही निधीअभावी काम थांबले असल्याचा आरोप करण्यात आला.त्याचबरोबर २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना नियमाकृत करून घरकुलाचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन देऊनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.या आंदोलनावेळी राम अंभोरे, पप्पू थोरात, गजानन कांगळे, प्रकाश बरेठिया, दिलीप सिडाम, आनंद शिवरकार, विजय कंगळे, संतोष अंभोरे आदींसह शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आंदोलकांनी इशारा दिला की, सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास हजारो नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकवला जाईल.

read also : https://ajinkyabharat.com/patur-talukyati-ambashi-yethil-incident/