मुंबई (प्रतिनिधी) – १ ऑगस्ट २०२५ पासून ICICI बँकेने यूपीआय व्यवहारांवर नवीन
शुल्क रचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेषतः पेमेंट अॅग्रीगेटर्समार्फत होणाऱ्या व्यवहारांवर आता ०.०२% ते ०.०४% शुल्क आकारले जाणार आहे.
शुल्क रचना अशी असेल:
ICICI बँकेत एस्क्रो खाते असलेल्या पेमेंट अॅग्रीगेटर्ससाठी: ०.०२% शुल्क, कमाल ₹६ प्रति व्यवहार.
ज्यांचे एस्क्रो खाते ICICI बँकेत नाही: ०.०४% शुल्क, कमाल ₹१० प्रति व्यवहार.
याचा ग्राहकांवर तातडीचा परिणाम नसेल, परंतु व्यापाऱ्यांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे.
सध्या ICICI आधी Yes Bank आणि Axis Bankनेही असेच शुल्क सुरू केल्याने हा ट्रेंड स्थिरावत असल्याचे संकेत.
युपीआय अजूनही सामान्य ग्राहकांसाठी विनामूल्यच आहे,
परंतु डिजिटल व्यवहारांचा खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पुढील धोरणांवर सर्वांचे लक्ष आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pandarakavada-forest-department-vaghini/