कारंजा ग्रामीण हद्दीत अवैध दारू विक्रीचे धक्कादायक उघडकीस येणे — पोलिसांची धडक कारवाई; ₹७२,१७५ मूल्याचा साठा जप्त
कारंजा – कारंजा पोलिस स्टेशनच्या ग्रामिण हद्दीत येणाऱ्या धामणी गावात अवैधरित्या देशी, विदेशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर ठाणेदार प्रविण शिंदे यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून धामणी येथे धडक कारवाई करण्यात आली.या कारवाईत पोलिसांनी कविता विजय पवार, संजय गोवर्धन पवार, मंगलाबाई तुकाराम कांबळे आणि संदीप प्रकाश कांबळे (सर्व रा. ग्राम धामणी) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण ₹७२,१७५ रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मच्यार्यांच्या सहभागाने करण्यात आली.स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या प्रभावी कारवाईचे मनोमन कौतुक केले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा अवैध धंद्यांना पूर्णपणे उधळण्यासाठी आणि समाजातील निष्पाप लोकांचे संरक्षण करण्यासाठी भविष्यातही अशाच ठोस आणि कठोर कारवाईची आवश्यकता आहे.सदर प्रकरणाची पुढील तपास प्रक्रिया सुरू असून, पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/latur-crime-update/#google_vignette
