पोट, मेंदू व हाडांसाठी होऊ शकतो गंभीर धोका
आपण रोजच्या जीवनात अन्न पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करत असतो. परंतु यापैकी कोणता पर्याय आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहे, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य पद्धतीने न पॅक केल्यास अन्नामुळे पोटाचे आजार, हाडांचे नुकसान आणि मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतात.
ॲल्युमिनियम फॉइलमुळे आरोग्यावर होणारा धोका
ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गरम अन्न पॅक केल्यास त्यात असलेले लवण आणि धातूचे कण अन्नात मिसळण्याची शक्यता असते. यामुळे अन्नाचा रासायनिक प्रतिक्रिया घडून येतो आणि ते शरीरात जाऊन पोट, हाड व मेंदू यावर परिणाम करू शकते. डॉक्टरांच्या मते, वेळेवर योग्य उपचार घेतले नाहीत तर यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.
बटर पेपर: सुरक्षित व फायदेशीर पर्याय
सेल्युलोजपासून बनलेला बटर पेपर अन्न पॅकिंगसाठी पूर्णपणे सुरक्षित मानला जातो. गरम अन्न ठेवण्यासाठीही तो अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा जास्त चांगला पर्याय आहे. बटर पेपर अन्नातील अतिरिक्त तेल शोषून घेतो व अन्नात कोणतीही रासायनिक प्रतिक्रिया होत नाही. तसेच, अन्न ओलसर होण्यापासूनही तो संरक्षण करतो.
बटर पेपरमध्ये कोणते पदार्थ पॅक करता येतात?
मसालेदार पदार्थ
आंबट पदार्थ
पराठे, पोळी
गरम अन्न
बटर पेपर जास्त तापमान सहन करू शकतो, त्यामुळे गरम पदार्थ सहज पॅक करता येतात. प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी काचेच्या किंवा सिलिकॉन कंटेनरमध्ये बटर पेपरचा वापर अधिक फायदेशीर आहे, कारण प्लास्टिकशी अन्नाची प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते.
अन्न पॅकिंगसाठी बटर पेपर वापरणे ॲल्युमिनियम फॉइलपेक्षा सुरक्षित व आरोग्यदायी आहे. त्यामुळे अन्न पॅक करताना नेहमी बटर पेपर वापरा आणि ॲल्युमिनियम फॉइलचा वापर टाळा.
read also :https://ajinkyabharat.com/navi-mumbai-aircraft-naming/