‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्…दारू पिऊन लॉजवर गेला

पुणे: पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्... चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती. मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली . असा झाला खुनाचा उलगडा माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन

वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे.

पुणे:  पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने

Related News

आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे.

हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर

सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता,

ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर)

असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.

तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे.

याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव,

आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे.

माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्…

चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत.

त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे.

पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो.

माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले.

भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना

त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले.

खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला.

त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला.

त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला.

रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती.

मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता.

शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली .

असा झाला खुनाचा उलगडा

माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली.

मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं.

पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर,

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे,

पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले.

त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक

प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले.

दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं

तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे.

तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला.

त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला.

त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

Related News