सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे लोणार सरोवराचे अस्तित्वच आले

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे लोणार सरोवराचे अस्तित्वच आले

लोणार (प्रतिनिधी):—-

जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत असून त्याच्या नैसर्गिक,

जैविक व वैज्ञानिक वैशिष्ट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील त्रुटींमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहरातील निघणारे सांडपाणी थेट सरोवरात मिसळत असल्यामुळे त्यातील जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलन पूर्णपणे ढासळत आहे.

शहरातील सांडपाणी थेट सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी तलावाच्या बंधाऱ्यावर सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता.

मात्र, या प्रकल्पाच्या कामात गंभीर दोष आढळून आले आहेत. त्यामुळे तो केवळ कागदावरच कार्यरत आहे.

प्रत्यक्षात संपूर्ण सांडपाणी सरोवरातच मिसळले जात असल्याची गंभीर बाब उघड झालीआहे.

मागील १५ वर्षांपासून ही समस्या कायम असून, अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.

परिणामी सरोवरातील सूक्ष्मजीव संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हे सरोवर जगातील खाऱ्या पाण्याच्या तीन विवरांपैकी एक आहे.

येथे आढळणारे सूक्ष्मजीव हे जागतिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

दि. २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक सांडपाणी एकाच वेळी आले.

त्यामुळे नदीच्या खड्याला बांधलेली संरक्षण भिंत निरुपयोगी ठरली आहे.

या भिंतीखालून सांडपाणी थेट सरोवरात गेल्याने त्यातील जैविक प्रणालीवर गंभीर परिणाम झाला आहे.

प्रकल्पाची कार्यपद्धती तातडीने तपासून त्वरित दुरुस्ती करावी आणि सांडपाण्याचे पुनर्वहन करून सरोवराचे रक्षण करावे,

अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.