Milind Narvekar Big Demand : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर सभागृहात म्हणाले,
शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल,
त्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा सुरू झाली. काय घडामोड घडली?
Related News
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मोठी मागणी केली.
त्यांनी लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचवेळी ते म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल.
त्यांच्या या मिश्किल शेऱ्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा झडली. काय आहे अपडेट?
याप्रकारे आसाम मध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी
गोळ्या घालायचा हा कायदा करण्यात आला. अगदी तसाच कायदा राज्यात सुद्धा करावा लागेल, राज्यात सुद्धा वाघाची
तस्करी आणि शिकार करणार्यांची टोळी कार्यरत असल्याचा दावा मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.
राज्य सरकारची भूमिका काय?
राज्यात वाघाची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फास
अडकल्याची घटना ताजी असताना पवनार येथे पिकेडी टी- ३३ च्या वाघिणीच्या गळ्यातही असाच फास आढळला.
नार्वेकर यांनी वाघाच्या शिकार आणि तस्करीच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.
त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
काय मांडली लक्षवेधी?
वाघाची शिकार तस्करी करणार्याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा,
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका,
आपल्या दोघांना यामध्ये मिळून काहीतर करावं लागेल, असे नार्वेकर म्हणाले.
येथेच आपण कितीतरी वाघ बसले आहोत असं म्हणतो. आता याच आपल्या वाघांनी एकत्र येऊन या वाघांना वाचण्यासाठी काहीतरी करावं,
असं म्हणत आपला प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी मांडला. वाघ वाचवण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची मागणी नार्वेकर यांनी केली.
गेल्या काही दिवसात वाघाची शिकार करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही भागात वाघाची तस्करी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत.