चंदन जंजाळ
बाळापूर ताप्र :- लोहारा ग्रा.पं.जवळ असलेल्या जि.प.उर्दू शाळा व मराठी शाळेसमोरील रस्त्यावर मोठ खड्डे पडल्याने त्या खड्यात पावसाचे पाणी साचते.
त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मोठया समस्यांचा सामना करावा लागत आहे.
यां समस्येमुळे उर्दू शाळेतील विद्यार्थी शाळेत येत नाहीत असा आरोप प्रशासना विरोधात शाळा व्यवस्थापन
समिती अध्यक्ष हाफिज अब्दुल हननान देशमुख यांनी गुरुवार दि.१७ जुलै रोजी सकाळी प्रसार माध्यमाशी बोलतांना केला.
व सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून कायमची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
यां संदर्भात ग्रामपंचायत सचिव राहुल उंदरे ग्राम विकास अधिकारी लोहारा यांना विचारणा करण्यात आली असता यां पूर्वी नागरिकांनी
दुसऱ्या रस्त्याबाबत समस्या सोडविण्याची मागणी केली असता तेथील खड्ड्यात मुरूम टाकण्यात आला होता.
व आता लोहारा ग्रा.पं.जवळ असलेल्या जि.प.उर्दू शाळा व मराठी शाळेसमोरील रस्त्यावर सुद्धा मुरूम
टाकण्यात येवून रस्त्याची दबाई करण्यात येईल असे आश्वासन ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी गुरुवारी सकाळी प्रसार माध्यमाशी बोलतांना दिले आहे.