रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे
वातावरण निर्माण केले आहे. त्यातच अकोट-अकोला रेल्वेमार्ग आणि अकोट रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
अकोट रेल्वे स्थानकावर एकही सुरक्षा कर्मचारी दिसत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे पोलीस आणि
Related News
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
लोहमार्ग पोलीस दलाचे कर्मचारी येथे नसल्यामुळे, प्रवास सुरक्षित नसल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.
अकोला स्टेशनवर जशी दुर्दैवी घटना घडली, तशीच अकोटमध्ये घडल्यास कोणाला दाद मागायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अकोट स्थानकावरून सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८ वाजता अशा तीन मेमू ट्रेन सुटतात, मात्र रात्रीच्या वेळी
प्रवाशांना भीतीच्या सावटाखाली प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासन अकोला सारखी
घटना अकोटमध्ये घडण्याची वाट बघत आहे का? असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
➤ “मी नेहमी अकोट-अकोला ट्रेनने प्रवास करतो, पण आजपर्यंत एकही पोलीस कर्मचारी दिसले नाहीत.
रात्री ८ वाजता प्रवास करताना भीती वाटते, आम्ही प्रवासी असुरक्षित आहोत.”
– राम तायडे, प्रवासी, अकोट
➤ “अकोट रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांची तैनाती करणे आवश्यक आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता,
येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, बऱ्याचदा लाईट बंद असतात
आणि महिलांसाठी प्रसाधनगृहांचीही सोय नाही. रेल्वे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे.”
– विजय जितकर, रेल्वे संघर्ष समिती सदस्य, अकोट
रेल्वे प्रशासनाची उदासीनता धोकादायक
रेल्वे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे त्वरित लक्ष देऊन अकोट स्थानकावर
आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.