Jiwant Satbara Mohim : ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे.
मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे.
राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे.
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे.
सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहे.
येत्या १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे.
मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.
बुलडाणा पॅटर्न सर्व राज्यात
सातबाऱ्यावरील मयतांच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणात अडचणी येत होत्या.
ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.
जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे आदेश दिले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ मार्चपासून जिवंत साताबारा मोहीम राबवण्यात आली आहे. हीच मोहीम आता राज्यभरात १ एप्रिलपासून सुरू होत आहे.
जिवंत साताबारा मोहिमेअंतर्गत साताबार उताऱ्यातील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे वारसांना येणारी अडचण दूर होणार आहे.
कशी असेल ‘जिवंत सातबारा मोहीम’?
– १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठी हे गावात चावडी वाचन करतील.
– न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
– ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठींकडे सादर करता येतील.
– स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई-फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.
– २१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठी यांनी ई-फेरफार प्रणाली मध्ये वारस फेरफार तयार करावा.
– त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरूस्त करावा.
– जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील.