उरळ |
मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
तसेच, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली.
वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप
या घटनेचे गांभीर्य ओळखून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पोलिस
अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांची भेट घेतली.
दोषी पोलिसांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली.
विद्यार्थी व युवक संतप्त
या प्रकरणानंतर शेकडो युवक आणि विद्यार्थ्यांनी उरळ पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला.
अमानुष मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आमच्यावर कोणत्याही कारणाशिवाय पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. आम्हाला न्याय हवा!”
➡️ या घटनेमुळे उरळ परिसरात मोठा संताप असून, प्रशासनाच्या पुढील कृतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.