महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु

नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून विशेष  रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तब्बल 356 विशेष रेल्वे धावणार आहेत.

Mumbai Nanded Train : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची नियमित रेल्वेसह उन्हाळी विशेष रेल्वे चालवणार आहे.

त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून रेल्वे धावणार आहेत.

या रेल्वेच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष रेल्वेंची एकूण संख्या आता 356 झाली आहे.

Related News

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड ही विशेष रेल्वे धावणार आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही रेल्वे सुरू होणार असून जून अखेरीपर्यंत ही रेल्वे धावणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 101105 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 9 एप्रिल ते 2025  ते 25 जून 2025 पर्यंत

दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 12.55 वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01106 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 9 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 पर्यंत दर बुधवारी नांदेड येथून रात्री 8 वाजता सुटेल

आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.45 वाजता पोहोचेल. या रेल्वेला एक प्रथम वातानुकूलित डबा,

एक द्वितीय वातानुकूलित डबा, 5 तृतीय वातानुकूलित डबे, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी

डबे, 1 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन, 1 जनरेशन व्हॅन आणि 1 पॅन्ट्री असेल.

या रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असेल.

गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह 25 मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

तसेच अनारक्षित डब्यासाठीचे तिकीट अतिजलद मेल, एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस द्वारे आरक्षित करता येतील.

नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे.

हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे.

दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, बंगळूर, चेन्नई, चंदिगढ, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम,

श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नांदेडसाठी थेट रेल्वेसेवा आहे.

शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.

Related News