डॉक्टरांचं कुटुंब हे सर्व मिळून देवदर्शनासाठी जात होते. मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच
त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला.
कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून त्यावरूनच अपघाताची भीषणता समोर येत आहे.
Related News
भारताची केळी राजधानी – जळगावचा सुवर्ण प्रवास
भारतामध्ये केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध असलेले फळ आहे. सकाळच्या नाश्त्यातील फ्रूट बाउलपासून...
Continue reading
भोजपुरी स्टार Pawan Singh यांच्या शोच्या नावावर १४ लाखांची फसवणूक; आझमगढ पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pawan Singh श...
Continue reading
PCOS असताना कॅलरी-डेफिसिट डायेट उलट का ठरू शकते? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला – ‘डायेटिंग थांबवा, योग्य खा’
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये
Continue reading
TRP रेस आठवडा ६: ‘KSBKBT 2’ पुन्हा अव्वल; ‘Anupamaa’ दुसऱ्या स्थानी, ‘Naagin 7’मध्ये इच्छाधारी ड्रॅगननंतर झपाट्याने वाढ
छोट्या पडद्यावरील मालिकांची TRP रे...
Continue reading
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना महावितरणकडून अभिवादन
नागपूर, दि. 20 फेब्रुवारी, 2026: मराठी वृत...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीला भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या या अपघातात डॉ.तन्वी आचार्य (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी
असलेल्या डॉ.नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला.
तर आणखी चौघे जणा गंभीर जखमी आहेत.
डॉ. उदय जोशी (64),डॉ. सीमा जोशी (59) दोघे रा.दादर,डॉ.सुबोध पंडित (62) रा.वसई, डॉ.अतुल आचार्य (55) रा. भिवंडी अशी जखमींची नावे आहेत.
त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण आहे.
मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार,हे सर्व डॉक्टर कुटुंबीय महाराष्ट्रातून कारने तीर्थयात्रा करण्यासाठी गेले होते.
अयोध्या येथील दर्शनानंतर हे सर्व कारने उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते.
पण या प्रवासादरम्यान मध्य प्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस पोलिस ठाणे क्षेत्रातील लुकवासा
चौकी अंतर्गत गुना शिवपुरी या महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित झाल्याने कार पुलाला ठोकर मारून नजीकच्या खड्ड्यात कोसळली.
पुढल्या मंदिरात जाण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोघींनी जीव गमवावा लागला.
हा अपघात एवढा जबरदस्त होता की या अपघातामध्ये दोन महिला डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर इतर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे हे वृत्त आणि दोन बहिणींचा मृत्यू यामुळे भिवंडीत हळहळ व्यक्त होत आहे.