‘मराठीला गोळी मारा’, नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

'मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

Vasai Woman Threat : तुमचे फ्लॅट्स विकून दुसरीकडे जा नाहीतर तुम्हाला आम्ही मानसिक त्रास देऊ अशी

सोसाटचीच्या सेक्रेटरीने आणि कमिटीने धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने केली आहे.

पालघर : घरातील पाण्याचा पुरवठा बंद केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी महिलेला

Related News

नायगावमधील एका सोसायटीतील सेक्रेटरीने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

तसेच या सेक्रेटरीने ‘मराठीला गोळी मारा’ असंही वक्तव्य केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वीटी मांडवकर या महिलेने वसई पोलिस ठाण्यात ही तक्रार केली आहे.

नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्वीटी नथुराम मांडवकर या महिलेने सोसायटीचे

मेंटेनन्स न भरल्यामुळे त्यांच्या घरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सेक्रेटरीकडे त्याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर

त्याने महिलेला ‘मराठीला गोळी मारा’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.

आर्थिक अडचणींमुळे थकबाकी

स्वीटी नथुराम मांडवकर यांनी त्यांची डिलिव्हरी झाल्यामुळे तसेच घरात चोरी झाल्याने आर्थिक

अडचणीमुळे सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते. त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले.

या सोसायटीमध्ये 91 फ्लॅट्स असून अनेक जणांची थकबाकी राहिली आहे.

तरीदेखील केवळ आपल्यावरच कारवाई करण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे.

कमिटी सदस्यांकडून मानसिक त्रास 

यासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांनी सेक्रेटरीला नोटीस मराठीत द्या अशी मागणी केली.

यावर सेक्रेटरीने संतापून ‘मराठीला गोळी मारा’ असे धक्कादायक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे मांडवकर यांनी वसई पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तसेच, सोसायटीतील काही सदस्य त्यांना मानसिक त्रास देत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

काय म्हटलंय तक्रारीत? 

वसई पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटलंय की, सेक्रेटरीने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेत तुम्ही मराठी लोकांनी फ्लॅट विकून जा, नाहीतर तुमचा आम्ही मानसिक आणि शारीरिक छळ करू अशी धमकी दिली.

तसेच कमिटीच्या सदस्यांकडून आपल्या घरातील लहाण मुलांवर जादूटोणा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असली तरी कमिटीकडून ते दिले जात नाही.

या आधीही सेक्रेटरी आणि कमिटीच्या सदस्यांनी एका वृद्ध व्यक्तीच्या घरचा पाणीपुरवठा बंद केला होता

आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

Related News