यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या
राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai: राज्याच्या महापालिका निवडणुकासंदर्भात संघटनात्मक मोर्चा बांधणीला
Related News
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फ...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्या...
Continue reading
सुरुवात केलेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(GudhiPadva Melava) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 30 मार्चला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई पालिका आणि
पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसेच्या 19 या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज ठाकरेंनी घेतला होता.
यात महापालिकेसाठी जबाबदाऱ्या वाटत शड्डू ठोकल्याचे दिसले. (Raj Thackeray)
यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय
घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनसे सैनिकांची गर्दी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची पुढील राजकीय दिशा कोणती यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मेळाव्याचा रस्ता मोकळा, परवानगी मिळाली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा झालाय. दादरच्या शिवाजी महाराज मैदानात गेल्या 30 मार्चला
होणाऱ्या मनसेच्या या मेळाव्याला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे.
या मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दादरच्या शिवाजी पार्क होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडतात ही महत्त्वाचे ठरणार आहे .
संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात
काही दिवसांपूर्वी कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी करणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या कामाचा लेखाजोखा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यासाठी संरचना करण्यात येत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते.
या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मिळाव्यात सांगितले होते.
आता मनसेची पुढची दिशा काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.