मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख”

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख"

यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,

असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.

विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.

Related News

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत.

नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात.

मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे.

बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

यावर बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे.

अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि त्यानंतर तो फरार झाला,

ही आश्चर्यकारक बाब आहे, असे देशमुख म्हणाले.

बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे. गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. जर शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच.

राज्यात मुली, तरुणी आणि महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.

राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

*कायदा व सुव्यवस्था धोक्यात*

राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी राज्य शासन आणि

गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

Related News