बीड जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या

महाराष्ट्र शासनावर जोरदार आरोप

बीड, – बीड जिल्ह्यातील गंभीर सामाजिक संकटाची छाया वाढत आहे. तिसऱ्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारवर मोठा आरोप केला जात आहे. समाजसेवक आणि कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारच्या अपयशामुळे जमातींच्या प्रमाणपत्रे मिळवण्याच्या प्रक्रियेमुळे अनेकांचे नैराश्य वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे.

 लक्ष्मण हाके म्हणाले,
“ही बीडमधील तिसरी आत्महत्या आहे. राज्य शासनाचे परिपत्रक आणि सीमिता नियुक्तीची प्रक्रिया इतकी क्लिष्ट व अवघड केली गेली आहे की जमातींच्या अनेक नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे नैराश्य वाढत आहे आणि त्यांच्यावर सामाजिक व आर्थिक दबाव वाढत चालला आहे.”

 उदाहरणार्थ त्यांनी कुंभार समाजातील एका व्यक्तीची घटना सांगितली, ज्याने आपल्या मुलीला लष्करी किंवा पोलीस सेवेत भरती होण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र अयशस्वी होऊन आत्महत्या केली.

 हाके यांचा आरोप –“या प्रकारच्या नैराश्याच्या घटनांना महाराष्ट्र शासनच कारणीभूत आहे. शासनने जमातींना प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी नियम सुलभ करावेत व गरजू नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.”

 या घटनेनंतर स्थानिक तसेच राज्यस्तरीय वातावरण तापले आहे. नागरिक आणि कार्यकर्ते शासनाच्या कारवायीकडे लक्ष वेधून देत आहेत.

read also :https://ajinkyabharat.com/bajetamadhya-rahayanyasathi/