बार्शीटाकळी पंचायत समितीत जागतिक क्षयरोग दिन आणि आशा दिन उत्साहात साजरा

बार्शीटाकळी पंचायत समितीत जागतिक क्षयरोग दिन आणि आशा दिन उत्साहात साजरा

पिंजर (प्रतिनिधी) – बार्शीटाकळी पंचायत समितीत 24 मार्च जागतिक क्षयरोग

दिन आणि आशा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी होते.

Related News

 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास डॉ. रविंद्र आर्य, तालुका आरोग्य अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी

जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 विविध उपक्रम आणि कार्यक्रम

   रांगोळी व निबंध स्पर्धा
   सांस्कृतिक कार्यक्रम

   आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम

कार्यक्रमात डॉ. शर्मा यांनी “टीबी मुक्त पंचायत” आणि क्षयरोग विषयक आरोग्य कार्यक्रमांवर मार्गदर्शन केले.

तसेच, क्षयरोग विषयावर उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 उपस्थित मान्यवर आणि सहभागी स्वयंसेविका

कार्यक्रमात संगीत जाधव, मंगला तितुर, शरद ठाकूर, राम बायस्कर, अमोल पाचडे, शिराज खान, शीतल ओळबे, धनंजय पालेकर,

मो. अरशद, रुपाली घोदखंडे, अंजली मार्गे, रश्मी लहुडकर, उषा जमणिक, संगीता खंडारे,

माधुरी पतींगे, संजीवनी राठोड, बबिता जाधव, रेणुका भारस्कार यांची उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्षयरोगाविषयी जागरूकता

निर्माण करण्यात आली आणि आशा स्वयंसेविकांच्या कार्याला गौरवण्यात आले.

Related News