बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण…

बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण…

Bangladesh : बांग्लादेशात मागच्यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाविरोधात आंदोलन इतकं तीव्र झालं की,

शेख हसीना यांना देशाबाहेर पळावं लागलं. त्यानंतर बांग्लादेशातील स्थिती रुळावर येईल असं वाटलं होतं.

पण उलट घडलं. बांग्लादेशात हजारो मजूर रस्त्यावर उतरले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांग्लादेशची वाटचाल अजून अस्थिरतेकडे सुरु आहे.

Related News

मागच्यावर्षी बांग्लादेशात सत्तापालट झाला. शेख हसीना यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडलं.

पण त्यानंतरही बांग्लादेशच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बांग्लादेशच्या राजधानीत शनिवारी हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते.

त्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन केलं. हायवे जाम केला.

कारखाने पुन्हा सुरु करण्याची, वार्षिक सुट्टी, वार्षिक सुट्टायांची भरपाई आणि बोनसची मागणी केली.

मजुरांनी दोन तास ढाका-मैमनसिंह राजमार्ग रोखून धरला. त्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं.

स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

विरोध प्रदर्शनादरम्यान अनेक मजुरांचे प्राणही गेले. ते गंभीररित्या जखमी झाले.

ढाका संभाग गाजीपूर जिल्ह्यात जायंट निट गारमेंट फॅक्ट्रीच्या मजुरांनी सकाळी फॅक्टरी बंद झाल्याची नोटीस पाहून विरोध प्रदर्शन सुरु केलं.

गाजीपुर औद्योगिक पोलीस उपनिरीक्षक (एसआय) फारुक हुसैन यांनी सांगितलं की,

श्रमिकांनी सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी गुरुवारी विरोध प्रदर्शन केलं होतं.

कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष

सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण श्रामिकांच्या समस्येच समाधान झालं नाही.

एका आंदोलकाने डेली स्टारला सांगितलं की, “आम्ही आमच्या कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष करतोय.

ईद जवळ येत आहे. मात्र, तरीही आमच्या सुट्ट्यांची भरपाई आणि बोनसची कुठलीही गॅरेंटी नाही”

वेतनाला विलंब

मागच्या आठवड्यात शेकडो श्रमिकांनी वेतन न मिळाल्याच्या मुद्यावरुन गाजीपुरच्या भोगरा बायपासवर ढाका-तंगैल आणि ढाका-मैमनसिंह हायवे जाम केला होता.

विरोध प्रदर्शनामुळे आधीपासूनच गर्दी असलेल्या भागात ट्रॅफिक जॅम झालं. आंदोलकांचा आरोप होता की, 300 पेक्षा अधिक मजुरांना वेतन मिळालेलं नाही.

अधिकारी कुठलही वैध कारण न देता त्यांच्या वेतनाला विलंब लावत आहेत.

हायवे ब्लॉक केलेला

स्थानिक मीडिया रिपोर्ट्नुसार मागच्या आठवड्यात गाजीपूर कलियाकोइरमध्ये कमीत कमी 15 कापड कारखान्याच्या मजुरांनी

एक कारखाना बंद झाला आणि श्रमिकांवरील कथित हल्ल्याच्या विरोधात ढाका-तंगैल हायवे ब्लॉक केला होता.

Related News