पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन सादर

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन सादर

अकोला जिल्ह्यातील दैनिक अजिंक्य भारतचे ज्येष्ठ पत्रकार आणि क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या

प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाडेगाव येथे स्थानिक पत्रकारांनी पोलिसांना निवेदन सादर केले.

दिनांक १९ मार्च रोजी रात्री खदान पोलीस स्टेशन अंतर्गत एसटी वर्कशॉपजवळ महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला,

Related News

ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, अन्यायाविरोधात लढणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत.

त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे आणि वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पंकज कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पत्रकार बंधू किशोर अवचार, राजेंद्र पल्हाडे, राजकुमार चिंचोळकर,

राहुल सोनोने, राधेश्याम कळसकार, डॉ. शेख चांद, चंदन जंजाळ, अविनाश कळसकार, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.

Related News