“धार्मिक भावना उद्धवस्त करणाऱ्या पोस्टरवर दुग्धभीषेक! अकोला पोलिसांच्या ताब्यात ३ जण”

“भयाणक घटना! ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीत पोस्टरवर दुग्धभीषेक

अकोला :ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात धार्मिक गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर आठ ते दहा अनोळखी व्यक्तींनी दुग्धभीषेक केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच, मिरवणुकीच्या वेळी काहींनी औरंगजेबाचे पोस्टर फिरवल्याचे दृश्यही समोर आले आहे.या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, स्थानिक शांतता आणि सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलिसांनी कलम 196, 3(5) BNS, स. क. 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी आशिष सुगंधी यांच्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू असून, तिघांना ताब्यात घेतले गेले आहे.पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास आणि आवश्यक ती कारवाई सुरू असून, घटनेच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/social-worker-rajendra-bhatkar-yancha-inspirational-guidance/