“दक्षिणेत महायुतीचा शक्तीप्रदर्शन; उत्तरचेही नेते एकवटले!”

उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या जागांचे परिसीमन तलवारीसारखे लटकत आहे. भाजप सरकार कोणताही विचारविनिमय न करता या विषयावर पुढे जात आहे. दक्षिणेतील जागा कमी आणि उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. उत्तरेत त्यांचा प्रभाव आहे. चार राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सहभागी या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

लोकसभा आणि विधानसभा जागांच्या सीमा नव्या पद्धतीने ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात.

यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये सीमांकन आयोग स्थापन करण्यात आले आहेत.

JAC meeting on Delimitation : राज्यांमधील लोकसभेच्या जागांच्या सीमांकनाबाबत शनिवारी चेन्नईमध्ये 5 राज्यांचे

Related News

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही बैठक बोलावली होती,

ज्यामध्ये 5 राज्यांतील 14 नेते सहभागी झाले होते. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि तृणमूलही सामील झाले.

अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन बैठकीत म्हणाले की, सीमांकनाच्या मुद्द्यावर आपल्याला एकजूट राहायची आहे.

अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल. संसदेतील आमचे प्रतिनिधित्व कमी होता कामा नये.

स्टॅलिन म्हणाले की, आपण एक संयुक्त कृती समिती (जेएसी) स्थापन केली पाहिजे.

याद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि त्याचा संदेश केंद्रापर्यंत पोहोचवला जाईल.

स्टॅलिन पुढे म्हणाले की, कायदेशीर बाबींचा विचार करण्यासाठी आम्हाला तज्ञांचे पॅनेल तयार करावे लागेल.

हा राजकीय लढा पुढे नेण्यासाठी कायदेशीर बाबींचाही विचार करावा लागेल. त्यासाठी सर्वांच्या सूचनांचा समावेश करावा.

आम्ही सीमांकनाच्या विरोधात नाही, आम्ही निष्पक्ष सीमांकनाच्या बाजूने आहोत.

उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या जागांचे परिसीमन तलवारीसारखे लटकत आहे.

भाजप सरकार कोणताही विचारविनिमय न करता या विषयावर पुढे जात आहे.

दक्षिणेतील जागा कमी आणि उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. उत्तरेत त्यांचा प्रभाव आहे.

चार राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सहभागी

या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी,

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव,

ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Related News