अकोला : अकोल्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तौहिद समीर बैद्यने चाकूचा धाक दाखवत ही घटना घडवली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. नातेवाईक गणपती पाण्यासाठी गेले असताना आरोपीने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
डाबकी रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. आरोपीचा सध्या अकोला परिसरात कसून शोध घेतला जात आहे. यापूर्वीही आरोपीने अनेक गुन्हे केल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्याचा आढावा घेत कारवाईला प्राधान्य दिले आहे.
या घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाकडून तातडीने न्याय मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
अकोल्यात घडलेली ही घटना सामाजिक न्यायासाठी मोठा धक्का मानली जात असून, समाजातील प्रत्येक घटकाला या प्रकाराविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/radio-show-drama-company-aani-cedicate-easywale-money/
