छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Bijapur Naxalites Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये बिजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.

पोलिसांनी चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी 22 नक्षलवाद्यांना ठार केल्याची पुष्टी केली आहे.

Related News

तर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात एक डीआरजी सैनिक जखमी झाला आहे.

बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात नक्षलमुक्त भारत अभियान सुरु आहे. संपूर्ण बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी पोलीस आणि जवान सज्ज आहेत.

गुरुवारी बिजापूर, नारायणपूर, दंतेवाडा, कांकेर जिल्हा आणि सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांवर कारवाईला पोलीस आणि जवानांनी सुरुवात केली आहे.

संभागच्या दोन वेगवेगळ्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर मोठ्या संख्येने जवान बाहेर पडले होते. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात जवानांनी 20 नक्षलवादी मारले. 18 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

कांकेरमध्येही 4 नक्षलवादी ठार

कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागातही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. इथेही पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे अस्तित्व आहे.

माहिती मिळताच सैनिकांनी केलेल्या कारवाई 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी येथून मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. येथे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, असे मानले जात आहे.

 

Related News