*चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी*

चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी* *जागतिक चिमणी दिवस विशेष

जागतिक चिमणी दिवस विशे सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था

व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे गेल्या पंधरा वर्षांपासून चिमणी

वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.

Related News

अकोल्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले सुनील कल्ले यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी ते 20 वर्षांपासून प्रयत्नरत आहेत.

चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्याची घरटी उभारली आहेत,

पक्ष्यांच्या या चाऱ्या पाण्याची बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि

विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, अनेक अनोळखी पक्षी वा व्यास्तव्यास असल्याचे कल्ले सांगतात.

काळाच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिऊताईचा चिवचिवाट कमी झाला आहे, चिऊताईचा संदर्भ

लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचविण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या तरी होत नसल्याचे चित्र आहे.

परंतू अकोल्यातील सुनील कल्ले हे त्यासाठी अपवाद ठरले आहे. शहरी भागात चिमण्यांना चाऱ्यासाठी

भटकंती करावी लागते, मात्र कल्ले यांनी केलेल्या चाऱ्याच्या सोयीमुळे त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात चिवचिवाट ऐकायला मिळते,

कल्ले यांचा भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

जुन्या काळात शेतातील अन्नधान्य चिमणी आणि पक्षांना खायला मिळायचं पण आता हरवेस्टरचा वापर सुरू झाल्याने,

शेतात धान्य पडत नाही. परिणामी पक्षांना अन्न शोधण्यासाठी भटकावं लागत.

ही परिस्तिथी पाहून आपण पक्षी संरक्षणासाठी काही तरी केले पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनात आली,

त्या दृष्टीने घराच्या खुल्या जागेत हिरव्या वेली व झाडांनी नटवले, पक्षांसाठी अनेक धान्याची घरटी तयार केली.

आता या धान्याच्या घरट्यांत शेकडो चिमण्या इतर पक्षांची ये-जा असते, अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही येथे येत असतात.

सुनील कल्ले हे अनेक वर्षांपासून पशु पक्षांची सेवा करत आहेत. मात्र त्यांच्या या सेवेत त्यांच्या पत्नीचाही

मोलाचा वाटा आहे. सुनील कल्ले प्रमाणे सुनीता कल्ले ह्याही प्राणी आणि पशु पक्षाची उत्तम देखभाल करतात.

पहाटे पासूनच पशु पक्षांना खाद्य-पाणी देने हे त्यांचे नित्यनियम झाले झाले आहे.

त्यामुळेच अनेक पक्षाची गर्दी कल्ले यांच्या घरी दिसते. तर यावर्षी हवामान खात्याने प्रखर उन्हाची शक्यता

सांगितल्याने कल्ले परिवाराने आता पक्षांसाठी ग्रीन नेटची सुविधा सुद्धा केली आहे.

यासंदर्भात सुनील कल्ले आणि त्यांच्या पत्नीसोबत बातचीत केलीय आमचे अजिंक्य भारत न्यूज चे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी

जीवजंतू पशु-पक्षी यांचा निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी मोठा वाटा असतो,

म्हणून पशु-पक्षीना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. सुनील कल्ले आणि त्यांच्या परिवार प्रमाणे सर्वांनीच असे कार्य करणे गरजेचे झाले आहे.

*चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी*

*जागतिक चिमणी दिवस विशेष*

सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व

सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे गेल्या पंधरा वर्षांपासून

चिमणी वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहेत.

सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.

अकोल्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले सुनील कल्ले यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे.

यासाठी ते 20 वर्षांपासून प्रयत्नरत आहेत.

चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्याची घरटी उभारली आहेत,

पक्ष्यांच्या या चाऱ्या पाण्याची बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि

विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, अनेक अनोळखी पक्षी वा व्यास्तव्यास असल्याचे कल्ले सांगतात.

काळाच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिऊताईचा चिवचिवाट कमी झाला आहे, चिऊताईचा संदर्भ

लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचविण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या

तरी होत नसल्याचे चित्र आहे. परंतू अकोल्यातील सुनील कल्ले हे त्यासाठी अपवाद ठरले आहे.

शहरी भागात चिमण्यांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते, मात्र कल्ले यांनी केलेल्या चाऱ्याच्या सोयीमुळे

त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात चिवचिवाट ऐकायला मिळते, कल्ले यांचा भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

जुन्या काळात शेतातील अन्नधान्य चिमणी आणि पक्षांना खायला मिळायचं पण आता हरवेस्टरचा वापर सुरू झाल्याने, शेतात धान्य पडत नाही.

परिणामी पक्षांना अन्न शोधण्यासाठी भटकावं लागत. ही परिस्तिथी पाहून आपण पक्षी संरक्षणासाठी काही तरी केले

पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनात आली, त्या दृष्टीने घराच्या खुल्या जागेत हिरव्या वेली व झाडांनी नटवले, पक्षांसाठी अनेक धान्याची घरटी तयार केली.

आता या धान्याच्या घरट्यांत शेकडो चिमण्या इतर पक्षांची ये-जा असते,

अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही येथे येत असतात. सुनील कल्ले हे अनेक वर्षांपासून पशु पक्षांची सेवा करत आहेत.

मात्र त्यांच्या या सेवेत त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. सुनील कल्ले प्रमाणे सुनीता

कल्ले ह्याही प्राणी आणि पशु पक्षाची उत्तम देखभाल करतात. पहाटे पासूनच पशु पक्षांना

खाद्य-पाणी देने हे त्यांचे नित्यनियम झाले झाले आहे. त्यामुळेच अनेक पक्षाची गर्दी कल्ले यांच्या घरी दिसते.

तर यावर्षी हवामान खात्याने प्रखर उन्हाची शक्यता सांगितल्याने कल्ले परिवाराने आता पक्षांसाठी

ग्रीन नेटची सुविधा सुद्धा केली आहे. यासंदर्भात सुनील कल्ले आणि त्यांच्या

पत्नीसोबत बातचीत केलीय आमचे अजिंक्य भारत न्यूज चे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी

जीवजंतू पशु-पक्षी यांचा निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी मोठा वाटा असतो,

म्हणून पशु-पक्षीना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.

सुनील कल्ले आणि त्यांच्या परिवार प्रमाणे सर्वांनीच असे कार्य करणे गरजेचे झाले आहे.

Related News