Sugarcane Juice : उन्हाळा सुरु झाल्याने ऊन मी म्हणत आहे.
अनेकजण उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी ऊसाच्या रसाची दुकाने शोधत असतात.
परंत ऊसाचा रस जर शरीराला चांगला असला तरी काही लोकांना तो मानवत नाही..
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
Loss of sugarcane juice : मार्च संपत असला तरी उन्हाचा तडाखा आता वाढत जाणार आहे.
अनेक जण ऊन्हाळ्यात ऊसाचा रस पिऊन जीव शांत करीत असतात.
ऊसाच्या रसात कॅल्शियम, तांबे, मॅग्नीशियम, मँगनीज, झिंक, आयर्न आणि पोटॅशियम अशी तत्वं आहेत.
ऊसाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ऊसाचा रस जेव्हा काढला जातो.
तेव्हा त्यात १५ टक्के कच्ची साखर असते. ती फळांच्या स्मूदीहून कमी असते.
जरी ऊसाचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी काही लोकांसाठी ऊसाचा रस धोकादायक देखील असू शकतो.
त्यामुळे ऊसाचा रस कोणी पिऊ नये याची माहीती वाचूया….
तज्ज्ञाच्या मते ऊसाचा रसात पॉलीकोसॅनॉल नावाचे तत्व आढळते.
हे रक्ताला पातळ करण्यात मदत करते. रक्तात गुठल्या तयार होऊ देत नाही.
यामुळे हृदयविकार असणाऱ्यांसाठी ऊसाचा रस चांगला आहे.
मात्र, जखम झाली तर ऊसाचा रस प्यायल्याने जास्त रक्तस्राव होऊ शकतो.
कोणी ऊसाचा रस पिऊ नये
डायबिटीज: २४० एमएल ऊसाच्या रसात ५० ग्रॅम साखर असते. ती १२ चमच्यांबरोबर असते.
पण ऊसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय ) कमी असते.
तर ग्लायसेमिक लोड ( जीएल ) जास्त असते. त्यामुळे ऊसाचा रस ब्लड शुगरला वाढवतो.
त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही ऊसाच्या रसाच्या वाट्याला जाऊ नये.
सर्दी-पडसे:
डोकेदुखी, सर्दी आणि पडसे सारख्या त्रासात ऊसाचा रस अजिबात घेऊ नये, त्यामुळे तब्येत आणखीनच खराब होऊ शकते.
ऊसाच्या रसाचा गुणधर्म थंड आहे. त्यामुळे पोलीकोसॅनॉल तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.
अनिद्रा:
डॉक्टराच्या मते ज्यांनी अनिद्रेचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस घेऊ नये,
ऊसाच्या रसात आढळणारे पोलीकोसॅनॉल तुम्हाला अनिद्रा देऊ शकते.
तुम्हाला आधीपासून ताणतणाव आणि अनिद्रेची समस्या असेल तर ऊसाचा रस अजिबात घेऊ नका…
कोलेस्ट्रॉल:
जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ऊसाच्या सेवनापासून दूर राहीले पाहीजे.
कारण गुड कोलेस्ट्रॉलला बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये कन्व्हर्ट करते.
त्यामुळे ऊसाचा रस प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.