अकोट: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळालेला निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होत असताना काही बँका हा
निधी थेट कर्ज कपात म्हणून वजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ढगा (ता. अकोट) येथील देवकन्या इंगळे यांच्या इंडस्लॅण्ड बँक, अकोट शाखेतील खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे ₹3000 जमा झाले होते.
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
मात्र, संबंधित बँकेने ती संपूर्ण रक्कम कर्जाच्या हप्त्यात वजा केली आहे.
बँकेकडून कपातीचे कारण – वरिष्ठ कार्यालयाचा आदेश?
या घटनेबाबत इंगळे यांनी बँक मॅनेजरशी विचारणा केली असता, “वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कपात करण्यात आली आहे”,
असे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे इतरही अनेक लाडल्या बहिणींच्या खात्यातील रक्कम कापली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लाडल्या बहिणींच्या मदतीसाठी सरकारने लक्ष द्यावे – नागरिकांची मागणी
मुख्यमंत्री एकीकडे महिलांना आर्थिक मदत देत असताना, बँका त्याच रकमेवर कर्ज कपात करत
असल्याने लाभार्थींना दिलेला निधी योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
तसेच जिल्हाधिकारी आणि बँकिंग प्राधिकरणांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आता होत आहे.
“भावाने पाठवलेली रक्कम मिळालीच नाही” – इंगळे यांची खंत
“माझ्या खात्यात जमा झालेले पैसे मी काढण्यासाठी गेले असता, बँकेने ते कर्ज कपातीसाठी वजा केले.
हे ऐकून मला खूप वाईट वाटले. भावाने दिलेली रक्कम मला मिळाली नाही.”
– देवकन्या इंगळे, लाडली बहीण, ढगा (ता. अकोट)
सरकारच्या निधीवर बँकांचाच डल्ला? या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी
आणि लाडल्या बहिणींना त्यांचा निधी संपूर्ण मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.