अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या
पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला
जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष
गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे.
➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही.
➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला,
तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन
“आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही.”
नागरिकांचे म्हणणे
गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार)
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही.
महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.”
➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.