उष्णतेचा चटका!

उष्णतेचा चटका!

चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाने कहर केला असून, सध्या पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Related News

दरवर्षी १ मेपासून करण्यात येणाऱ्या वेळेच्या बदलाची अंमलबजावणी यंदा आठवडाभर आधीच करण्यात आली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्यात वाघ व अन्य वन्यजीव नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात.

त्यामुळे व्याघ्र दर्शनाची संधी वाढते. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक त्रस्त होत असल्याने प्रशासनाने

दुपारच्या सत्रातील सफारीची वेळ २.३० ते ६.३० ऐवजी आता ३.०० ते ७.०० अशी निश्चित केली आहे.

सफारी बुकिंग रद्द, पर्यटकांचा कल थंड हवामानाकडे

गेल्या आठवड्यापासून चंद्रपुरात तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान आहे.

या तीव्र उष्णतेमुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यातील अनेक सफारी बुकिंग्स रद्द करण्यात आली आहेत.

पूर्वी उन्हाळ्यातील शाळांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी दिसायची, मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे पर्यटक थंड हवामानाच्या ठिकाणी जाणं पसंत करत आहेत.

प्रशासनाकडून आरोग्यविषयक सूचना

पर्यटकांनी सफारीसाठी निघण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्यावी, भरपूर पाणी प्यावं, टोपी, सनग्लासेस आणि हलके,

उन्हापासून संरक्षण करणारे कपडे वापरावेत, असे आरोग्यविषयक सल्ले प्रशासनाने दिले आहेत.

स्थानिक मार्गदर्शकांचा निर्णयाला पाठिंबा

ताडोबामधील स्थानिक मार्गदर्शक, वाहनचालक व पर्यटन व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

“उन्हाळ्यात पर्यटन वाढतं, पण यंदाची गरमी खूपच लवकर जाणवतेय.

वेळ पुढे ढकलल्यामुळे पर्यटकांना थोडा दिलासा मिळेल,” असं एका मार्गदर्शकाने सांगितलं.

Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-santapachi-lat/

Related News