रामनवमीसाठी अयोध्येत अकोल्याच्या अभ्यंकर परिवाराकडून 1 लाख रजगिरा लाडूंचे वाटप!

रामनवमीसाठी अयोध्येत अकोल्याच्या अभ्यंकर परिवाराकडून 1 लाख रजगिरा लाडूंचे वाटप!

अकोला: अयोध्येतील रामनवमी उत्सवाच्या दिवशी (6 एप्रिल)

अकोल्यातील अभ्यंकर परिवाराकडून 1 लाख रजगिराचे लाडू मोफत वाटप करण्यात येणार आहे.

संकल्प पूर्णत्वास

Related News

मागील वर्षी अभ्यंकर परिवाराने 1 लाख लाडू वाटपाचा संकल्प घेतला होता.

यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून परवानगी मिळाल्यानंतर आता मोठ्या उत्साहाने लाडू तयार करण्याचे काम सुरू आहे.

विशेष तयारी

हे लाडू बनवण्यासाठी 500 किलो गूळ आणि 500 किलो

राजगिरा लाहीचा वापर करण्यात येणार आहे.

संपूर्ण परिवार आणि अकोल्यातील नागरिकांचे सहकार्य मिळत असून, दिवस-रात्र मेहनत सुरू आहे.

2 एप्रिलला लाडूंचा ट्रक अयोध्येस रवाना

हे लाडू 2 एप्रिल रोजी ट्रकद्वारे अयोध्येला पाठवले जातील आणि राम भक्तांना मोफत प्रसाद म्हणून वाटप होईल.

अकोल्याच्या नावाचा गौरव

अभ्यंकर परिवाराला मिळालेल्या या विशेष संधीमुळे अकोल्याचे

नाव अयोध्येतील पवित्र राम मंदिराशी जोडले गेले आहे.

 या उपक्रमामुळे राम भक्तांमध्ये उत्साह असून, अभ्यंकर परिवाराच्या

या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related News