भारत-पाकिस्तान फायनलपूर्वी शोएब अख्तरचा आक्रमक अंदाज पुन्हा एकदा चर्चेत, आशिया कप 2025 चा हाय-वोल्टेज भारत-पाकिस्तान फायनल 28 सप्टेंबर रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अख्तरने केलेलं वक्तव्य आता वादग्रस्त ठरत असून भारत-पाकिस्तान सामन्याचं तापमान आणखी वाढलं आहे. शोएब अख्तर म्हणाला, “या रविवारी, 28 सप्टेंबरला पाकिस्तानी टीमने भारताची घमेंड मोडावी. त्यांचा अहंकार मारावा. मैदानात उतरतानाच ‘मारण्याच्या इराद्याने’ उतरा. आपण कुठल्या मातीचे बनलो आहोत हे भारताला दाखवून द्या!” या आक्रमक वक्तव्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारताने आपल्या सर्व सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर पाकिस्तानने संघर्ष करून अंतिम फेरी गाठली आहे.
यंदाच्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील हा तिसरा सामना आहे. दोन्ही आधीच्या सामन्यांमध्ये भारताने सहज विजय मिळवला आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शोएब अख्तरचं वादग्रस्त वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत असून, सामना अधिकच रोमांचक होणार यात शंका नाही. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता दुबईकडे लागले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/nalanda-municipal-drain-dam-kamaat-prachanda-corruption/
