दिल्ली –
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून,
या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी
Related News
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.
क...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.
फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच...
Continue reading
अकोला - सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश
जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी...
Continue reading
मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घ...
Continue reading
नवी दिल्ली | 1 जुलैपासून लागू
एलपीजी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी
सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० ची कपात केली आहे. ही...
Continue reading
प्रतिनिधी । भोपाल
हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना
भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू या...
Continue reading
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जक...
Continue reading
बाळापूर (अकोला) प्रतिनिधी
बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटन...
Continue reading
विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी
अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट
तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) ...
Continue reading
हल्ला मानला जात असून, या हल्ल्यामागे असलेला मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद उर्फ
सैफुल्लाह कसुरी हा TRF (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.
हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि लष्करचा उपप्रमुख
सैफुल्लाह खालिदचा संबंध थेट लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असून,
तो हाफिज सईदचा निकटवर्तीय समजला जातो. तो TRF आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) या
संघटनांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे उघड झाले आहे.
त्याने 2000 च्या दशकात पाकिस्तानातील मुरीदके येथील लष्कर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार
सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्ला आणि नौमान या नावांनीही ओळखला जातो.
तो गेल्या 20 वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रिय असून, पूंछ-राजौरी भागामध्ये लष्करच्या कारवायांचे तो प्रमुख सूत्रधार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील खुईरट्टा दातेस भागातून तो भारतात दहशतवाद्यांना पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
TRFच्या स्थापनेमागे खालिद
TRF आणि PAFF या संघटनांची स्थापना सैफुल्लाह खालिदनेच केली.
हल्ल्यांची थेट जबाबदारी टाळण्यासाठी, या संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या अन्य गटांच्या नावाखाली काम करतात.
TRF ही लष्कर-ए-तैयबाच्या छुप्या कारवायांची ‘फ्रंट ऑर्गनायझेशन’ मानली जाते.
पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग
गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, सैफुल्लाह खालिदने पहलगाम हल्ल्याच्या
पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते.
काही दिवसांपूर्वीच तो भारतात घुसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, खालिद सध्या NIA व इतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.
काश्मीर ताब्यात घेण्याची वल्गना
फेब्रुवारी 2025 मध्ये खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत सैफुल्लाह खालिदने भारताविरुद्ध भडकावू भाषण दिले होते.
“आज 2 फेब्रुवारी 2025 आहे. आम्ही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेऊ,” अशी वल्गना त्याने केली होती.
त्याच्या या वक्तव्यांमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhargad-these-veteran-mahilas-fatal-mahaan/