संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५ —
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय महिलेला आपल्या अनैतिक
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
संबंधांमुळे तीन चिमुकल्यांचे बळी द्यावेसे वाटले.
पोलिस तपासात उघड झालेल्या या धक्कादायक माहितीने परिसरात खळबळ उडाली आहे.
२७ मार्च रोजी, रात्रीच्या जेवणात रजिताने दह्यामध्ये विष मिसळले होते.
तिचा नवरा चेन्नय्या कामावर गेल्यामुळे तो वाचला, पण तीनही मुलांनी ती दही खाल्ली आणि काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतलेल्या चेन्नय्याला मुले बेशुद्धावस्थेत आढळली,
तर रजिता देखील पोटदुखीची तक्रार करत होती. त्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सुरुवातीला पोलिसांनी संशयाच्या धर्तीवर चेन्नय्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते,
मात्र पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले.
एका गेट-टुगेदर कार्यक्रमात रजिताची एका जुन्या मित्राशी पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात
अनैतिक संबंध सुरु झाले. नंतर या संबंधांना पुढे नेत नवीन आयुष्य जगण्यासाठी रजिताने
स्वतःच्या मुलांचा जीव घेण्याचा अमानुष निर्णय घेतल्याची कबुली तिने दिली.
पोलिसांकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील संपूर्ण माहिती अधिकृतपणे दिली जाणार आहे.
या घटनेने स्थानिकांसह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-samari-ahwal-ughad/