बुलढाण्यात लोक अचानक टक्कल का झाले? कारण उघड! तुम्हीही ही चूक करत नाही ना?

बुलढाण्यात लोक अचानक टक्कल का झाले? कारण उघड! तुम्हीही ही चूक करत नाही ना?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,

त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.

देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच

Related News

आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत.

त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे.

त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.

या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.

येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे.
त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/aashiqui-2-pair-again-with-elder-brother-shraddha-kapoor-and-aditya-roy-kapur-in-a-romantic-role/

Related News